नशिराबादजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत ३ परप्रांतीय मजूर ठार

परप्रांतीय मजूर ठार

जळगाव (उपसंपादक नंदुआप्पा पाटील) : नशिराबाद येथे पुलाच्या कडेला झोपलेल्या परप्रांतीय तीन मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडल्याने ठार झाले आहेत. मंगळवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले. पंचनामा करून त्यांनी तिघांचेही मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यासाठी पाठवले. दरम्यान या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जवळच्या नशिराबाद नजीक असलेल्या खुर्द गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला रोडचे काम सुरू आहे. तेथे अनेक मजूर काम करत असतात. काल नेहमीप्रमाणे दिवसभर काम केल्यावर काही मजुरांनी रस्त्याच्या कडेलाच अंग टाकले. दमल्याने ते मजूर रस्त्याच्या शेजारी असलेल्या पुलावर झोपले होते. मजूर झोपलेले असताना अंधारात अज्ञात वाहनाने तिघांना जागेवरच चिरडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मृत झालेले हे तीनही मजूर परप्रांतीय होते, मात्र ते कोठून आले होते याबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. यासदर्भात पोलिसांकडून अद्याप माहिती घेण्याचं काम सुरु आहे. या अपघातासंदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here