पिलीव येथील आकाश खुर्द या तरुणाचा संशयास्पद मृत्यू : वन विभागाच्या हद्दीत आढळला निवस्त्र मृतदेह

संशयास्पद मृत्यू

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील आकाश अंकुश खुर्द-पाटील वय 32 वर्ष या तरुणाचा माळशिरस-पिलीव रोड वरती पिलीव हद्दीत असणाऱ्या वन विभागाच्या क्षेत्रामध्ये निवस्त्र असा संशयास्पद असा मृतदेह आढळून आला.

 

त्याच्या शरीरावरती गरम आशा लोखंडी सळईने चटके दिले असल्यासारख्या जखमा दिसून येत असून तोंडातून ही रक्त आलेले पहावयास मिळाले,त्याच्या मृतदेहा शेजारीच त्याची मोटरसायकली आढळून आली असल्याने पिलीव सह परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे,सदर घटनेची माहिती मिळताच पिलीव औट पोस्टचे पोलीस कर्मचारी यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा सुरू केला.

यावेळी मृतदेह पाहण्यासाठी पिलीवसह परिसरातील लोकांनी गर्दी केली असून पिलीव गावातील एका होतकरू तरुणाचा असा संशयास्पद व निवस्त्र अवस्थेत आज्ञातस्थळी मृतदेह आढळून आल्याने हळहळ व्यक्त होत आहे,सदरच्या संशयास्पद मृत्यू विषयी संबंधित असलेले आरोपी लवकरच गजाआड होतील असे घटनास्थळावरील जमलेल्या लोकांमधून चर्चिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here