सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : सोलापूर जिल्हा माध्यमिक सेवक व शिक्षक पतसंस्था मर्यादित बाळे, सोलापूर यांच्यातर्फे देण्यात येणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शरद पवार विद्यालय शरद नगर प्रशालेतील भारत रायबान यांना प्रदान करण्यात आला.
गतवर्षी प्रमाणे देण्यात येणारा सोलापूर जिल्हा माध्यमिक सेवक शिक्षक पतसंस्था मर्या.बाळे, सोलापूर आदर्श शिक्षक पुरस्कार उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी बद्दल विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून शरद पवार विद्यालयातील सहशिक्षक श्री.भारत मच्छिंद्र रायबान यांना देण्यात आला.
याप्रसंगी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, संस्थेचे चेअरमन राजेंद्र माळी, सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर शरद पवार विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्रथमेश (भैय्या) पाटील, सचिव बळवंत पाटील, प्राचार्य श्री. माने, पाटील ए.टी., श्री. पवार, श्री. कोरे, श्री.गोडसे, श्री.गायकवाड, प्राध्यापिका भुसे एल. एन., शिक्षकेतर कर्मचारी पाटील धनाजी, बापुसो तोरमळे, अभिषेक गोडसे उपस्थित होते. सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







