ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : कल्याणनजीकच्या टिटवाळा परिसरातील रिक्षा चालकाने घरात घुसून दोन शाळकरी मुलींचा विनयभंग केला. मुली आवडतात म्हणून या रिक्षा चालकाने हे कृत्य केले. याप्रकरणी रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण तालुकातल्या टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हेमंत पवार या रिक्षा चालकाने घरात घुसून दोन शाळकरी मुलींचा विनयभंग केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर टिटवळ्यामध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
‘मुली आवडतात म्हणून या रिक्षा चालकाने भरदिवसा घरात घुसून दोन्ही विद्यार्थिनीचा विनयभंग केला. घडल्या प्रकारामुळे या मुली घाबरल्या त्यांनी प्रतिकार करत आरडाओरडा केला. त्यामुळे रिक्षा चालकाने तिथून पळ काढला. या प्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या काही तासांत या रिक्षा चालकाला बेड्या ठोकल्या. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.







