तीन किलो सोनं खरेदी करत दिला न वटणारा चेक; व्यापाऱ्याची २ कोटी रुपयांची फसवणूक

crime
File Photo

नागपूर (प्रतिनिधी) : येथे सराफ व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सव्वा तीन किलोहुन अधिक वजनाचे सोन्याचे दागिने एकाने खरेदी केले. या बदल्यात दागिन्यांची झालेली रक्कम रोख स्वरूपात न देता त्याचा धनादेश दिला. मात्र हा धनादेश न वटणारा देत सराफा व्यापाऱ्याला २ कोटी ३४ लाख रुपयात गंडा घातल्याचा प्रकार समोर आला.

 

नागपूरच्या राणा प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदरची घटना घडली आहे. जयंत वसंतराव पालकर असे फसवणूक झालेल्या सोने व्यापाऱ्याचे नाव आहे. तर राहुल कुमार नरेशचंद्र खाबिया याने व्यापार्याची दागिने घेत फसवणूक केली आहे. दरम्यान संशयित आरोपी राहुलकुमार हा सोन्याच्या दुकानात येऊन नेहमी सोने खरेदी करायचा. त्याचवेळी ऑनलाइन पेमेंट सुद्धा करायचा, असे करत त्याने विश्वास संपादन केला.

राहुलकुमार हा अनेकदा दुकानात येऊन नियमित सोनं खरेदी करत होता. त्यामुळे सोने व्यापाऱ्यांचा विश्वास त्याच्यावर बसला. यात त्याने व्यापारी असल्याचे सांगत नफ्यातील पैसे सोन्यात गुंतवत असल्याचं त्याने सुवर्ण व्यावसायिकास सांगितले होते. यातच त्याने फेब्रुवारी २०२४ मध्ये दोन किलो १४८ ग्रॅम सोने खरेदी केले. त्या बदल्यात त्याने दीड कोटी रुपयांचा धनादेश दिला. तसेच १० फेब्रुवारीनंतर बँकेत टाकण्यास सांगितले.

त्यानंतर राहुलकुमार पुन्हा एकदा दुकानात जाऊन त्याने एक किलो २४१ ग्रॅम सोने खरेदी केले. या बी बदल्यात देखील त्याने एक कोटी ८० लाख रुपयाचे नवीन धनादेश दिला. दरम्यान सुवर्ण व्यावसायिकाने दोन्ही धनादेश बँकेत टाकले असता ते वटले नाही. त्यामुळे व्यापाऱ्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. राणा प्रतापनागर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here