पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गुडविल फौंडेशन,दिव्यांग व अनाथ मुलांची संस्था, प्राधिकरण निगडी येथे वूमेन्स डे सेलेब्रेशन व दिव्यांगासाठी रोजगाराची सुरुवात असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

यावेळी संस्थापक : प्रतिक्षा देशपांडे, खजिनदार : प्रविण देशपांडे, विश्वस्त : निता देशपांडे, प्रमुख पाहुणे :श्रीमती मीरा ताई आरेकर, प्रमुख पाहुणे :नगरसेविका शैलेजा मोरे माजी उप महापौर पीसीएमसी प्रमुख पाहुणे – सौ शर्मिला बाबर नगरसेविका, प्रमुख पाहूणे -सौ कमल घोलप नगरसेविका यमुना नगर, विशेष उपस्थिती : वैभवी घोडके आणि कल्पना जाधव या समाजिक कार्यकर्त्या व सुयश बचत गटातील महिलाचा सहभाग होता.
दिव्यांग मुलींसाठी सौ.मीरा आरेकर यांनी कापूर बनवण्याची मशीन दान केली. तसेच समाजातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.तसेच अनेक दिव्यांग बंधू भगिनीही उपस्थित होते.या कार्यक्रमात दिव्यांगाना तसेच समाजातील गरजू महिलांना रोजगारा विषयी अनेक उपक्रमाची माहिती व व्याख्यान देण्यात आले.







