शिर्डीत महसूल मंडल अधिकाऱ्याची मनमानी; नागरिक त्रस्त, अधिकारी मात्र सुस्त

महसूल मंडल अधिकाऱ्याची मनमानी

लहुजी सेनेची कारवाई करण्याची मागणी

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : महसूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शिर्डी तलाठी कार्यालयातील मंडल अधिकारी नागरिकांना खरेदी खत नोंदणी वारसाची नोंदणी त्याच बरोबर जमिनीचे असलेले वाद यावर तोडगा काढण्याचे काम किंवा सुनावणीचे काम मंड ल अधिकाऱ्यांच्या अधिकारात येत असते मात्र शिर्डीचे मंडल अधिकारी सुनावणीच्या वेळी आलेल्या दोन्ही पक्ष करांचे म्हणणे ऐकून घेता त म्हणणे ऐकून घेतल्या नंतर निवाडा देताना पक्षपात पणा करून खऱ्या पक्ष कारावर अन्याय करण्याचा त्यांचा सध्या सपाटा चालू आहे.

यामुळे प्रामाणिक नागरिक त्रस्त झाले असून यावर राहाता तहसीलदार शिर्डी प्रांत अधिकारी यांनी योग्य तोडगा काढावा अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांनी केली आहे त्यांनी म्हंटले आहे की एक महिन्यांपूर्वी शिर्डीतील एका नामकीत पतसंस्थे कडून एका व्यक्तीने आपला मालकीचा फ्लॅट देऊन गहांन खत केले होते सदर पतसंस्थेने त्या व्यक्तीचे कर्ज ही मंजूर केले होते मात्र गहान खताचा बोजा नोंद होण्यासाठी एकवीस दिवसाचा कालावधी लागतो या कालावधी मध्ये दुसऱ्या पक्ष काराणे सदर जागेवर कर्ज देऊ नये अशी हरकत घेतली सदर हरकतीची सुनावणी माननीय महाशय मंडल अधिकारी यांच्यासमोर ठेवण्यात आली या सुनावणीच्या वेळी मूळ कर्जदार तक्रार दार आणि कर्ज देणारी पतसंस्था चे व्यवस्थापक यांना सुनावणी नोटीस देऊन सुनावणीची तारीख देण्यात आली सदर सुनावणीच्या वेळी पतसंस्थेच्या व्यवस्थापकांनी सदर बोजा चढविण्यास तक्रार अर्ज असेल तर बोजाची नोंद मंजूर करू नये असे लेखी म्हणणे मंडल अधिकारी यांना दिले मात्र मंडल अधिकाऱ्यांनी चार प्रति मध्ये लेखी म्हणणे घेतल्याची कोणतीही पोच व्यवस्थापकाला दिली नाही व्यवस्थापकांनी सदर म्हणण्याची पोच सही करून द्या अशी मागणी केली असता आपण पोहच देत नाहीत असे उत्तर मंडल अधिकाऱ्याने देऊन पोहच देण्यास स्पष्ट नकार दिला मात्र सदर खटल्याची काय सुनावणी झाली या निकालाची प्रतही संस्थेला अद्याप दिली नसून मात्र बोजाची नोंद न करण्यासाठी तक्रार असूनही एक तर्फी निकाल देऊन सदर गहान खताची नोंद मंडल अधिकाऱ्यांनी मंजूर केली असून एका प्रकारे एक तर्फी निकाल दिला असल्याचे व्यवस्थापकांनी म्हंटले आहे.

सदर प्रकरणाची चौकशी करणार : तहसीलदार राहाता
या प्रकरणाबाबत राहाताचे तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे भ्रमण ध्वनी द्वारे संपर्क केला असता कुणावरही अन्याय होणार नाही संबंधित अधिकाऱ्याने अन्याय केला असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

आपण दिलेल्या म्हणण्याची मूळ कागदपत्रे आपणाकडे असून आपण वरिष्टाकाडे न्याय मागणार असल्याचे व्यवस्थापकांनी म्हंटले आहे साईंच्या नगरीत असा मनमानी कारभार मंडल अधिकाऱ्याकडून थांबला नाही तर आपण महसूल मंत्री नामदार चंद्र शेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार करणार असून एकाच जागेवर तीन वर्ष सेवा झाली असून अशा एकतर्फी निर्णय देणाऱ्या मंडल अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी करणार आहे असे बागुल यांनी म्हंटले आहे या निवेदनाच्या प्रति माननीय तहसीलदार माननीय प्रांत अधिकारी माननीय पालकमंत्री माननीय जिल्हाधिकारी माननीय महसूल मंत्री यांना ही पाठविणार असल्याचे बागुल यांनी शेवटी म्हंटले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here