सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभारावर लहुजी पॅंथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी दलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी सांगोला पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभारावर संघटनेचे नेते एडवोकेट अभिषेक कांबळे यांनी तासोरी ओढले या मोर्चा च्या कार्यकर्त्यांसह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
दलित समाजाच्या विधवा दलित महिलेकडून पैसे घेणाऱ्या पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभारावर संघटनेचे नेते व कार्यकर्ते घरकुल मजुरीसाठी उर्वरित हप्ते बँकेत जमा करण्यासाठी संगत मताने पैसे मागणाऱ्या ग्रामसेवक कारकून गटविकास अधिकारी यांचे खातेनिहाय चौकशी करावी. जुजारपूर गावातील दलित वस्तीमध्ये फेवर ब्लॉक कामाची सफल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी. महिला व बालकल्याण विभागाने बोगस लाभार्थी दाखवून भ्रष्टाचार केला असून खातेनिहाय चौकशी करावी. घरकुलधारकांना मोफत वाळू पुरवठा करण्यात यावा. दलित वस्तीमध्ये कामासाठी मागासवर्गीय ठेकेदारांना प्राधान्य देण्यात यावी. ग्रामपंचायत मध्ये आरक्षित 15 टक्के निधी ग्रामसेवक व सरपंच संगत मताने इतर ठिकाणी खर्च करत असल्याने तो थांबवा. यासह इतर मागणीसाठी लहुजी पॅंथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवार 12 मार्च रोजी पंचायत समितीवर धडक मोर्चा काढला होता.
विधवा महिलेची जाणीवपूर्वक आर्थिक पिळवणूक पंचायत समितीमधील अधिकारी यांच्या मार्फत केली जाते घरकुल मंजूर करण्यासाठी व हप्ता बँकेत जमा करण्यासाठी ग्रामसेवक तीन हजार रुपये ची मागणी करत आहेत दलित वस्तीसाठी राखीव 15 टक्के निधी सरपंच ग्रामसेवक इतर ठिकाणी खर्च करून दलित वस्त्यांना विकासापासून वंचित ठेवत असून अशा भ्रष्ट लोकांना पाठीशी घालायचे काम गट विकास अधिकारी करत असल्याचा आरोप करून पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभारावर एडवोकेट अभिषेक कांबळे यांनी निषेध केला. लहुजी पॅंथर सेनेचे अध्यक्ष नितीन रणदिवे म्हणाले पंचायत समितीत जास्त भ्रष्टाचार आणि दलित बांधावर अन्याय होत आहे दलितांची पिळुवनुक करण्याचा एक कलमी कार्यक्रम पंचायत समिती मध्ये सुरू असल्याने या भ्रष्ट कारभाऱ्यांच्या विरोधात आमचे आंदोलन सुरू राहील असा इशारा नितीन रणदिवे यांनी दिला. यावेळी पोलीस मित्र संघटनेच्या महिला माया रणदिवे. माणिक सकट. रघुनाथ ऐवळे. लहुजी पॅंथर सेनेचे महेश वाघमारे. धोंडीराम कांबळे. राजाभाऊ मुळीक. महिला शक्ती सेनेच्या जयश्री सावंत यांनी तीव्र शब्दात पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध केला.







