बलुचिस्तानमध्ये २४ तासांत दुसऱ्यांदा दहशतवादी हल्ला; पाकिस्तानी जवान जखमी

दहशतवादी हल्ला

क्वेटा (पाकिस्तान) (वृत्तसंस्था) : बलुचिस्तानमध्ये २४ तासांत दुसऱ्यांदा दहशतवादी हल्ला झाल्याने परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. केच जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात अनेक पाकिस्तानी जवान जखमी झाले असून, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने हा हल्ला घडवून आणल्याचा संशय आहे.

 

पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर बॉम्बने हल्ला करण्यात आला, ज्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे समजते. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर संघर्ष सुरू केला आहे. शुक्रवारी त्यांनी ओलीस ठेवलेल्या सर्व 214 सैनिकांना ठार केले होते.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी लष्कराला कैद्यांच्या अदलाबदलीसाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, शाहबाज शरीफ सरकार आणि पाकिस्तानी लष्कराने कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी, 214 सैनिकांना प्राण गमवावे लागले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here