पाकिस्तानात आकाशातच विमानाचे चाक झाले गायब

विमानाचे चाक झाले गायब

इस्लामाबाद (पाकिस्तान) (वृत्तसंस्था) : कराची ते लाहोर प्रवास करणाऱ्या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या विमानाच्या चाकाच्या गूढ गायब होण्याच्या घटनेने विमान वाहतुकीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

 

गुरुवारी (दि.१३ मार्च) पीआयएच्या PK-306 क्रमांकाच्या विमानाने कराचीहून लाहोरकडे उड्डाण घेतले. उड्डाणाच्या वेळी सर्व काही सुरळीत होते, मात्र लाहोर विमानतळावर लँड झाल्यानंतर विमानाच्या लँडिंग गिअरच्या सहा चाकांपैकी एक चाक गायब असल्याचे निदर्शनास आले.

या घटनेने सुरक्षाविषयक चिंता वाढवल्या आहेत. विमानाचे चाक कराची विमानतळावरच गायब झाले की ते आकाशात निखळले, याचा शोध सुरू असल्याचे पीआयएच्या प्रवक्त्याने सांगितले. मात्र, कराची विमानतळावर या चाकाचे काही तुकडे सापडल्याचा दावाही करण्यात आला आहे. विमानाने नेमके कशा परिस्थितीत उड्डाण केले आणि लँडिंगदरम्यान हे चाक कुठे गेले, याची सखोल चौकशी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here