वैशाली (बिहार) (वृत्तसंस्था) : जिल्ह्यात होळीच्या दिवशी नवऱ्याने बायकोला मित्रासोबत बोलण्यास रोखल्याने, दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या बायकोने नवऱ्याचे गुप्तांग कापले. घटनास्थळीच नवऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून बोयकोला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथलेश पासवान मजुरीचे काम करून कुटुंबाचे पोट भरत होते. ऋतिक, रिशु आणि निशांत कुमार ही तीन मुले त्याला होती. होळी खेळून मिथलेश पासवान जेव्हा घरी आला त्यावेळी बायकोला दुसऱ्यासोबत बोलताना पकडले. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या बायकोने नवऱ्याच्या गुप्तांगावर चाकूने सपासप वार केले, यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
गावकऱ्यांनी मिथिलेशला लालगंज रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मिथिलेश याचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवला अन् प्रियंका हिला बेड्या ठोकल्या. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.







