पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) : भाळवणी गावच्या चैतन्य देठे व राधिका देठे या शाळकरी बहीण भावांचा पंढरपूर येथे अपघात झाला या अपघातामध्ये चैतन्य देठे या शाळकरी मुलांचा मृत्यू झाला तसेच राधिका देठे हिचा पण जबरदस्त अपघात झाला राधिका देठे अतिशय गंभीर जखमी अवस्थेत होती या अपघातामध्ये तिच्या मांड्यांना खूप मार लागलेला होता सदर मुलीचा सोलापुरात उपचार करण्यास अशक्य होते घरची परिस्थिती अतिशय बिकट असल्याने उपचाराचा खर्च त्यांना न परवडणार होता पंढरपूर ये थील डॉक्टरांनी रुग्णाच्या वडिलांना पुणे येथील मंगेशकर रुग्णालयात उपचार घेण्याचे सांगितले.
सदर उपचाराचा खर्च बारा लाख रुपयाच्या आसपास येणार होता तरी त्या मुलीच्या वडिलांनी राधिकाला पुणे येथे मंगेशकर रुग्णालयात दाखल केले ही बातमी आमच्या प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री सोमनाथ पवार यांना कळाली लगेचच त्यांनी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री उमेश कल्याणी यांच्याशी संपर्क केला सदर मुलीला वैद्यकीय मदत मिळावी म्हणून व घटनेचे गांभीर्य ओळखून उमेश कल्याणी यांनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना संपर्क केला वरील घटना त्यांना सांगितली लगेचच त्यांनी मंगेशकर रुग्णालयाच्या डॉक्टरांना फोन करून उपचार करण्यास सांगितले तसेच सोलापूर जिल्हा शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख सुरज जम्मा यांनी पुणे शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख प्रशांत डाबी, शुभम हिंगे मंगेश भालेकर यांना त्वरित फोन करून सदर मुलीचा मोफत उपचार करण्यास सांगितले तात्काळ त्यांनी पुणे शिवसेना वैद्यकीय कक्ष टीमला मंगेशकर रुग्णालयात पाठविले आणि मोफत उपचार करण्यास सांगितले सदर रुग्णाला जास्तीत जास्त मदत करण्याचे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले
संवेदनशील उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री वैद्यकिय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यामुळे त्या मुलीचे प्राण वाचले. याप्रसंगी शिवसेना वैद्यकीय कक्ष सोलापूरचे प्रमुख सुरज जमा पुणे शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रशांत डाबी शुभम हिंगे मनीष भालेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभल.
प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश कल्याणी तसेच प्रहार शिक्षक संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष श्री सोमनाथ पवार तसेच प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री सचिन नागटिळक सर तसेच प्रहार शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी अगदी मनापासून उपमुख्यमंत्री वैद्य कक्षाचे प्रमुख श्री मंगेश चिवटे यांचे आभार मानतो त्यांच्या प्रयत्नामुळे एका शाळकरी मुलीचा जीव वाचला.







