जोशीला पगारिया राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित

राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला

धुळे (जिल्हा क्राईम रिपोर्टर पूर्वा भगत) : महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळेतर्फे साक्री येथील जोशीला पगारिया यांना राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्कार माजी आमदार शरद पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.

 

व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुरेखाताई देवरे, महापौर प्रतिभाताई चौधरी, नगरसेवक सौ.वंदनाताई भामरे, सौ.मनिषाताई डियालानी,प्रा. डॉ. बापूसो. अनिलजी महादू चौधरी, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये समाजपयोगी कर्तृंव गाजवणाऱ्या २३ रणरागिणींचा सन्मान राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्कार देऊन करण्यात आला.

 

राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिलाया कार्यक्रमाचे आयोजन निसर्ग मित्र समिती धुळे च्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य उपाध्यक्ष डॉ. रेखा कुंवर यांचे राजमाता जिजाऊ यांच्या जीवन चरित्रावर अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नूतन पाटील जिल्हाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड समिती धुळे यांनी केले तर आभार श्रीमती पाटील यांनी मानले.या कार्यक्रमाला सोशल अँड कल्चरल असोसिएशन कुसुंबा संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ अनिल चौधरी, संस्थेचे संचालक तथा उपप्राचार्य डॉ. एम.जी. कासार, संस्थेचे संचालक पी.पी. सूर्यवंशी,आबासो.सुनिल दिगंबर पवार,सौ.छाया परदेशी, प्राचार्य डाॅ.एस.जी. बाविस्कर, मुख्याध्यापक सुरेंद्र परदेशी, संस्थेचे संचालक दादासो.गणेशजी अनिल चौधरी.. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कम॔चारी उपस्थित होते.

जोशीला पगारिया यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. बुलंद पोलीस टाइम्सतर्फे उपसंपादक प्रशांत सूर्यवंशी व धुळे क्राइम रिपोर्टर पूर्वा भगत यांनीही जोशीला पगारिया यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here