शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : गुरुवारी (दि.१३) साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे होळी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. होळी पौर्णिमेच्या दिवशी मां लक्ष्मी आणि श्री हरि विष्णु यांची पूजा केली जाते. यामुळे आर्थिक समस्यांमधून आराम मिळतो आणि सुख-समृद्धी वाढते, असे मानले जाते.
होळी हा सण फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येतो. होळीला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, हुताशनी पौर्णिमा अशीही नावे आहेत. होळी हा रंगाचा सण आहे. होळीच्या दिवशी एकमेकांना रंग लावून गळाभेट घेतली जाते. होळीच्या दिवशी एकत्र येऊन पक्वान्नांचा आनंद घेतला जातो. होळी हा वसंत ऋतूचे आगमन आणि वाईटावर चांगल्याचा विजय, तसेच प्रेम आणि एकता साजरी करण्याचे प्रतीक आहे. होळीची उत्पत्ती हिंदू पौराणिक कथा आणि परंपरेत झाली आहे. होळी हा राक्षस राजा हिरण्यकश्यप, त्याचा मुलगा प्रल्हाद आणि बहीण होलिका यांच्या आख्यायिकेशी संबंधित आहे.
या सणाच्या निमित्ताने साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथील सर्व विद्यार्थी कर्मचारी मिळून होळी पौर्णिमा हा सण साजरा करण्यात आला. हा सर्व कार्यक्रम विद्यालयातील मुख्याध्यापिका व सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला.







