जळगाव (कार्यकारी संपादक विवेक खडसे) : जळगाव येथील मन्यारखेडा येथे दिनांक १२ मार्च रोजी श्री बदरीनाथ मंदिराचा शिलान्यास सोहळा संपन्न झाला. श्री बदरीनाथ मंदिराचे गादीपती प. पू. स. गु. मयूरदादा महाराजश्री यांनी जळगाव ते श्री हिमालय धामाची पायी यात्रा करून जी पवित्र शिला जळगाव शहरात आणली.
त्या शिलेवर हा सर्वं विधी पडला ४ फूट बाय ४ फूट व ४. फूट ४ फूट खोल असणाऱ्या गर्तात उतरून मयूरदादा महाराजश्री यांनी ही पवित्र शिला सर्वं भक्तांच्या उपस्थित स्थापित केली या वेळेस सर्वं भारत भूमीतील तिर्थातील पवित्र माती व जल या वेळेस वापरण्यात आले व त्या नंतर हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला
याप्रसंगी मयूरदादा महाराजश्री यांनी सांगितले हे मंदीर आपल्या सनातन संस्कृतीच मुख्य केंद्र आहे म्हणून मंदिराच्या निर्माण कार्यात सर्वं भक्तांनी योगदान द्यावे असे महाराजश्री नी बोलताना सांगितले.







