भुसावळ (महाराष्ट्र उपसंपादक गिरीश पवार) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, माजी जिल्हा कार्यवाह तथा श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष, पालक गोविज्ञान अनुसंधान केंद्र हरिपूरा मोहराळाचे अध्यक्ष बापूराव मांडे यांचे रविवारी पहाटे ५.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी सकाळी आठ वाजता हरिपुरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, धर्म जागरणचे प्रांताचे कार्य करणारे सोनु भाऊ अर्थात महेंद्र प्रभाकर मांडे यांचे बापूराव मांडे हे वडिल आहेत. त्यांच्या निधनाने खान्देशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्य वाढविणारा ज्येष्ठ स्वयंसेवक हरपला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार तसेच संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, मुक्ताई शिशू मंदीर जिजामाता प्राथमिक विद्यालय, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, महाराणा प्रताप विद्यालय हिंदूसभा न्यास, भुसावळ तसेच आश्रमशाळा हरिपुरा, गोविज्ञान केंद्र हरिपूरा असा मोठा परिवार आहे.







