पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) : पंढरपूर ज्यांच्या जीभेवर सरस्वती आणि हृदयात श्री राम वास करतो, असे शब्दप्रभू माजी मंत्री, विधानसभेतील मुलुखमैदान तोफ असणारे श्री लक्ष्मण राव ढोबळे यांना पी एच डी प्राप्त झाल्याने पंढरपूर येथील माजी नगरसेवक नागेश यादव यांनी आनंदोत्सव साजरा केला.
नगरसेवक नागेश (भाऊ)यादव म्हणाले माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा सन्मान,निष्ठा कशी असावी त्याचं उदाहरण म्हणजे श्री लक्ष्मण राव ढोबळे सर.शब्दप्रभू म्हटलं की ज्येष्ठापासून सर्वसामान्य नागरिकांच्या नजरेसमोर चित्र उभे राहते ते म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सर यांचे, कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात छत्रपती,फुले,शाहू,आंबेडकर यांचे विचार रुजवण्याचे काम त्यांनी आजवर केले आहे.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अश्या अनेक प्लॅटफॉर्मवर जाऊन त्यांनी आपल्या कृतुत्वाचा ठसा उमटवला आहे. एवढेच नव्हे तर बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभरात एकतेचा आणि समतेचा संदेश दिला आहे. अशा सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक कला क्रीडा कार्यामध्ये अग्रेसर असणारे शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सर यांना सोलापूर विद्यापीठाने डॉक्टर की म्हणजेच पीएचडी पदवी त्याना बहाल केले आहे. याचेच औचित्य साधून आज बहुजन परिषद सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक नागेश भाऊ यादव मित्रपरिवार यांच्यावतीने माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या सोलापूर येथील राहत्या घरी जाऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
आज सोलापूर विद्यापीठाने लक्ष्मणराव ढोबळे यांना पीएचडी पदवी बहाल केल्यामुळे सन्मान करण्यात आला.यावेळी माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी औपचारिक चर्चा करत असताना मागील 30 ते 35वर्षापासून आपल्या सोबत एका निष्ठेने काम करत असणारे नगरसेवक नागेश भाऊ यादव यांचे कौतुक करत निष्ठा कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजेच नागेश भाऊ यादव असल्याचे प्रतिपादन ढोबळे यांनी व्यक्त केले.यावेळी नगरसेवक नागेश भाऊ यादव, प्रकाश खंदारे मंगळवेढा, लहू रणदिवे,सूर्यभान वाघमारे, दादा गव्हाणे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.







