पुणे (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर अविनाश मुंढे) : महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ सलग्न भारतीय मजदुर संघाने सुरक्षा रक्षकांच्या अनेक प्रश्न मंडळाकडे सादर करून ही पुर्ण केले जात नाही.मंडळाकडून सुरक्षा रक्षकांची भरती केली जाते पण चार वर्षे झाली अद्याप प्रतीक्षा यादी संपली नाही,नवीन आस्थापना नोंदीत करत नाही आणि ज्या आहेत त्यावर कुठली कारवाई करत नसल्याने सुरक्षा रक्षकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.
मंडळाचे अध्यक्ष, सचिव, निरीक्षक कोण हेच अद्याप अनेक सुरक्षा रक्षकांना माहिती नसल्याने इतर कर्मचारी स्वतः निर्णय सुरक्षा रक्षकांच्या नोकऱ्या सुरक्षा पर्यवेक्षक यांच्यामार्फत नोकरी समाप्त करत आहेत.मंडळाचे सचिव भेटण्यासाठी केबिनबाहेर दोन ते तीन तास थांबवून ठेऊन वेळ न देता निघुन जातात.अध्यक्ष साहेब मिटिंगसाठी वेळ देत नाहीत.
मंडळ अपघात झालेल्या सुरक्षा रक्षकांची ESIC ला चुकीची माहिती देऊन सुरक्षा रक्षकांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित ठेवून नोकरी समाप्त करीत आहे.अशा होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रलंबित मागण्यांसाठी
१) खाकी गणवेश त्वरित वाटप करून रू.६५० प्रति ड्रेस प्रमाणे शिलाई द्यावी.
२) महापारेषण अंतर्गत सबस्टेशन मधील नोंदीत सुरक्षा रक्षकांना मे २०२३ ते नोव्हेंबर २०२३ वेतनावरील फरकाची रक्कम देण्यात यावी.
३) आस्थापनेत मागणीनुसार सुरक्षा रक्षक पाठवुन मुलाखत पद्धत बंद करावी.
४) सुरक्षा रक्षकांना सेवा पुस्तिका देण्यात यावी.
५) दर्जेदार ओळखपत्र देण्यात यावे.म्हणजे त्यावरील शाई पुसणार नाही.
६) सन २०२० मधील गणवेशाची रक्कम देण्यात यावी.
७) सुरक्षा रक्षकांना पेन्शन योजना लागु करावी.
अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी दि.२५/०३/२०२५ रोजी अप्पर कामगार आयुक्त,पुणे विभाग पुणे,संगमवाडी, पुणे या ठिकाणी आय वॉन्ट जस्टीस आमरण उपोषण करणार आहे.अशी माहिती महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ सलग्न भारतीय मजदुर संघाचे उपोषण कर्ते प्रदेश कार्याध्यक्ष अनिल पारधी अविनाश मुंढे संघटनमंत्री,जिल्हाध्यक्ष युवराज नाळे,सचिव तुकाराम कुंभार,पिंपरी चिंचवड अध्यक्ष राजकुमार काळे,सयाजी कदम यांनी दिली.







