शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : मनसे व जागृती युवक मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली.
मनसेचे दत्तात्रेय कोते यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रींच्या मूर्तीचे विधीवत पुजन खा. भाऊसाहेब वाकचौरे, अभय शेळके, शिवाजी गोंदकर, मुख्याधिकारी सतिष दिघे, पोलीस उपाधीक्षक शिरिष वमने, सोसायटी चेअरमन गोपीनाथ गोंदकर, नितीन कोते, संजय शिंदे, सचिन शिदे, सुजित गोंदकर, सचिन तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवाजी गोंदकर म्हणाले, नगरसेवक दत्तात्रय कोते दरवर्षी महाराजांची जयंती साजरी करतात त्यांच्या मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. अभय शेळके म्हणाले संपूर्ण जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन नागरिकांचा सन्मान दत्तात्रय कोते करतात. जागृती मंडळाचे काम कौतुकास्पद आहे. यावेळेस सचिन तांबे यांनी या चौकास छत्रपती शिवाजी महाराज चौक नाव देऊन सुशोभीकरण केले, पण आज महाराजांचा चौक जागृती मंडळाने सुशोभित केला.
कार्यक्रमास एम्प्लॉईज सोसायटी चेअरमन विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे, आप्पासाहेब कोते, विनायक कोते, प्रमोद गोंदकर, गजानन शेरवेकर, तानाजी गोंदकर, प्रताप जगताप, विकास गोंदकर, पोपट कोते, डिगुनाना कोते, विजय गोंदकर, रोहित वाकचौरे, सुनिल परदेशी, विकास कोते, सुधीर शिंदे, प्रतिक शेळके, अमोल गायके, पप्पु गायके, चेतन कोते, नितीन अशोक कोते, शंकर गोंदकर, दिनेश शिंदे, सुंदर सुपेकर, प्रकाश गोंदकर, मच्छिंद्र वारूळे, बाळासाहेब काटकर, प्रसाद बावचे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.







