कल्याण (सहसंपादक नामदेव पाटील) : कल्याण ता. पोलीस ठाणे हद्दीत म्हारळगांव, ता. कल्याण येथील सुर्यानगर परिसरात मागिल 01 वर्षा पुर्वी दिनांक 09/01/2024 रोजी राजन उर्फ जानु श्याम येरकर या 18 वर्ष तरुणाचा त्याचे 04 मिञांनी मिळुन अग्निशस्ञाने गोळी झाडुन खुन केला होता. त्याबाबत कल्याण ता. पो.स्टे. गु.र.नं. 23/2024 भा.द.वि.स. कलम 302,323,504,506,34 प्रमाणे दिनांक – 09/01/2024 रोजी गुन्हा दाखल आहे. गुन्हयात यापुर्वी 03 आरोपी अटक करण्यात आले होते.
गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे परवेज अकबर अली शेख, वय – 34 वर्ष, राहणार – रुम नं.3, चाळ नं. 5, श्रीजी चाळ, मलखांब कंम्पाऊंड जवळ, म्हारळगांव, ता. कल्याण जि.ठाणे हा सुमारे 01 वर्षा पासुन आपले अस्थित्व लपवुन बिहार व इतर राज्यात वास्तव्य करीत होता व अधुनमुधन कल्याण परिसरात येत होता. तांञिक विश्लेषणाचे अधारे व गुप्त बातमीदाराकडुन आरोपीत हा कल्याण परिसरात येणार असल्याची खाञीशिर माहिती मिळाली त्यानुसार तांञिक विश्लेषण करुन दिनांक 14/03/2025 रोजी आरोपीत यास फळेगांव, ता. कल्याण येथे सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले आहे. अशा प्रकारे खुनाच्या गुन्हयात फरार असलेला आरोपीत यास अटक करण्यात आली आरोपीत याचे विरुध्द फसवणुकीचे इतरही गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण श्री. डी.एस.स्वामी, मा. अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण श्री. भरत तांगडे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, मुरबाड विभाग, श्री. जगदीश शिंदे, पोलीस निरीक्षक, कल्याण ता. श्री. सुरेश कदम यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि/मुदगुन, पोउनि/मोरे, पोहवा/बडगे, पोना/भोईर, पोशि/निर्मल, पोशि/बावदाने, पोशि/काळे, पोशि/गुजर अशा प्रथकाने केली आहे.







