सावदा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जागेचे भूमिपूजन

छत्रपती शिवाजी

सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : शिवजयंतीच्या मुहर्तावर येथील शासकीय विश्रामगृहाशेजारी प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाचे पुतळ्यासाठी जागा दान देणाऱ्या सावदा शहरातील नामचीन पाटील परिवारातर्फे मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते शिवजयंती च्या दिवशी भूमिपूजन करण्यात आले.

 

छत्रपती शिवाजी सावदा येथील सौजन्य फांडेशन तर्फें छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यपुतळा उभारणीचे काम लवकरच करण्यात येणार आहे. यासाठी येथील माजी नगराध्यक्ष कै. विष्णू हरी पाटील यांच्या परिवारातील (कै.) वसंतराव पाटील, रवींद्र पाटील, सुधीर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी जागा दान केली असून सतीष पाटील, मनोजकुमार पाटील, अमोल पाटील, तृप्ती पाटील, सोनाली दीक्षित, पूजा पाटील, अश्विनी प्रभू, वंदा पाटणेकर, आकाश पाटील यांनी पुतळा उभारण्यासाठी सहकार्य केले आहे.

तसेच लोकवर्गणीतून या पुतळ्याचे काम होणार असून, अंदाजे दीड कोटीचा खर्च अपेक्षित आहे. याप्रसंगी शास्त्री विश्वप्रकाशदास प्रा.व.पू. होले, स.पो.नि. विशाल पाटील, पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे, नरंद्र नारखेडे, सीमरन वानखेडे यांनी विचार मांडले. यावेळी मान्यवरांनी छ्त्रपती शिवाजी महाराजयांच्या प्रतिमेला अभिवादन केले. माजी नगराध्यक्ष नीता पाटील, नगरसेवक रवींद्र बेंडाळे, अनिल सरोदे, श्याम अकोले, चंद्रशेखर पाटील, जगदीश बढ़े, जे. के. भारंबे, शिवाजी भारंबे, जितेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. सौजन्य फाऊंडेशनचे अध्यक्ष मिलिंद पाटील, उपाध्यक्ष धनंजय चौधरी, सचिव श्यामकांत पाटील, सहसचिव भरत नेहेते, सदस्य अनिल लोखंडे, सभासद शरद भारंबे, नितीन महाजन यांनी आयोजन केले. तर सूत्रसंचालन श्यामकांत पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here