मातंग समाज महाअधिवेशनातील ठरावाचे लेखी दस्त मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर

देवेंद्र फडणवीस

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : पुणे येथे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मातंग समाजाचे पहिले राष्ट्रीय महा अधिवेशन पुणे या ठिकाणी दिनांक १ मार्च २०२५ रोजी यशस्वीरित्या संपन्न झाले या अधिवेशनास महाराष्ट्र सह देशातील सात राज्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महा अधिवेशनात उपस्थित राहता आले नाही याबद्दल मुख्यमंत्र्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली.

 

 

या ऐतिहासिक अधिवेशनामध्ये मातंग समाजाच्या विविध प्रश्नावर सामूहिक चर्चा करून उपस्थित सर्वानुमते आणि ठराव पारित करण्यात आले. या ठराव मध्ये निवृत्त न्यायमूर्ती अनंत बिदर समितीने तात्काळ अहवाल सादर करून. अनुसूचित जाती आरक्षणाचे अ ब क ड वर्गीकरण तात्काळ करण्यात यावी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. पुणे येथील लहुजी वस्ताद तालमीस राष्ट्रीय स्मारकाच्या दर्जा देण्यात यावा. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील जाचक अटी रद्द करण्यात यावे. वंचित उपेक्षित समाज घटकासह मातंग समाजाच्या आरक्षण वर्गीकरणाच्या लढ्यात लहुजी शक्ती सेनेचे कार्य मोठे आहे.

लहुजी सेना समाजमान्य संघटना असून महायुती सोबत असल्याचा अभिमान आहे. मातंग समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्याची जबाबदारी महायुती सरकारने घेतली आहे , असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे साहेब प्रदेशाध्यक्ष कैलास दादा खंदारे यांच्या भेटीदरम्यान मुंबई येथे काढले आहेत. सदरची भेट १८ मार्च रोजी विधान भवन मुंबई येथे मुख्यमंत्री कार्यालय येथे झाले आहे. यावेळी लहुजी शक्ती सेना आयोजित पुणे येथे झालेल्या मातंग समाजाच्या फोटो व चित्रफित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here