प्रहार शिक्षक संघटनेचे आंदोलन : शालार्थ आयडी मिळाल्याने तेरा वर्षानी मिळणार शिक्षकांना पगार

प्रहार शिक्षक संघटनेचे आंदोलन

पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) : सोलापूर जिल्ह्यातील चांगदेव पाटील विद्यालय, दहिटणे ता. बार्शी येथील सहशिक्षक विक्रम काळे व भाग्यश्री साबळे यांचा शाळार्थ आय डी तीन दिवसांच्या उपोषणानंतर मिळाला असल्याची माहिती प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष सचिन नागटिळक यांनी दिली.

 

एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून शासनाने २० टक्के टप्पा अनुदान दिले होते परंतु शाळार्थ नसल्याने काळे व साबळे हे गेल्या तेरा वर्षापासून वेतनापासून वंचित होते. शाळार्थ मिळण्यासाठी त्यांनी गेल्या दीड वर्षापासून पाठपुरावा केला होता परंतु उपसंचालक कार्यालयाने त्रुटी काढल्याने त्यांचा शाळार्थ रखडला होता.

शाळार्थ मिळावा या मागणीसाठी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग पुणे येथे १८ मार्च पासून सहकुटुंब बेमुदत उपोषण केले होते. उन्हातील या तीव्रतेची दाखल घेवून अखेर तीन दिवसानी सर्व कागदपत्रांची त्रुटी पूर्तता करून मूळ कागदपत्रे, रोस्टर पाहून त्याना शाळार्थ देण्यात आला. शाळार्थ मिळाल्याने त्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. वेतन मिळणार असल्याने त्यांचा तेरा वर्षाचा वनवास संपला असल्याची भावना काळे व साबळे यांनी व्यक्त केली.

यासाठी वरिष्ठ लिपिक मयूर प्रधान, शिक्षण निरीक्षक रावसाहेब मिरगणे, उपसंचालक हारून आतार यांनी सहकार्य केल्याची भावना नागनाथ साबळे यांनी व्यक्त केली. प्रहार शिक्षक संघटनेच्या उपोषणात जिल्हाध्यक्ष सचिन नागटिळक, विक्रम काळे, कोमल काळे त्यांची मुले, नागनाथ साबळे, सोमशेखर केशेट्टी, निलेश माने, मालकप्पा ढब्बे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here