पारनेर (तालुका प्रतिनिधी सुनिल लोणकर) : पौळाचीवाडी ( मोठा तांडा ) ता. गेवराई येथे होलीकोत्सवानिमित्त बंजारा सेवा फाउंडेशन आयोजित व्दितीय ग्राम कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव राठोड यांच्या हस्ते गोर बंजारा ध्वजस्तंभ लोकार्पण व संत श्री सेवालाल महाराज चौक नामकरण सोहळा फाउंडेशनचे सदस्य, ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
मातृभूमीच्या विकासासाठी समाज बांधवांनी संघटीत होऊन सामाजिक विधायक कार्य करावे या उद्देशाने प्रेरित होऊन बंजारा सेवा फाउंडेशनची स्थापना करण्यात आलेली असून दरवर्षी फाउंडेशनमार्फत तांड्यात होळीनिमित्त एकत्र येऊन लोकोपयोगी कार्य केले जाते. यावर्षी एकवीस फुट ध्वजस्तंभ उभारण्याचे कार्य केले. उभारलेला स्तंभ पाहून ग्रामस्थांनी ध्वजस्तंभाभोवती फेर धरून पारंपारिक लेंगीनृत्य सादर केले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बंजारा सेवा फाउंडेशनचे संचालक कवी संदीप राठोड यांनी सांगीतले की, तरुणांनी संत सेवालाल महाराजांचे विचार आत्मसाद करावे. जो ध्वज हातात घेऊन सदगुरू सेवालाल महाराजांनी विखूरलेल्या बंजारा समाजाला एकत्र करून मानवतेची शिकवण दिली, ज्या ध्वजाने धर्म रक्षण्याचे धडे दिले त्या ध्वजाचे अनावरण सर्वांच्या योगदानाने पूर्ण झाले ही गोष्ट भावी पिढीला नक्कीच दिशादर्शक ठरेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
फाउंडेशनची योग्य दिशेने वाटचाल चालू आहे. फाउंडेशनच्या निश्वार्थ कार्यामुळे तांडा आपल्याकडे खूप आशेने पाहत आहे. मातृभूमीची सेवा करण्यासाठी भूमीपुत्रांनी पुढे यावे असे अवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक राठोड यांनी केले. ज्येष्ठ नागरीकांनी फाउंडेशनचे कौतुक करून शुभाशीर्वाद दिले. तुमच्या सत्कार्यात आम्ही सोबत आहोत याची ग्वाही दिली. वडीलधाऱ्यांनी दिलेली ही कौतुकाची थाप पुढील कार्यास उत्साह देणारी आहे असे प्रतिपादन दिलीप राठोड यांनी केले. यावेळी भिवा राठोड, विजय राठोड, पवन राठोड, शरद राठोड व भारत राठोड यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन राठोड यांनी केले तर आभार सतिश राठोड यांनी मानले.
यावेळी राजन राठोड, प्रकाश राठोड, राजु वडते, अमोल राठोड, अजय चव्हाण, विकास जाधव, रवि राठोड, बाळासाहेब जाधव, अनिल राठोड, रवि धारू राठोड, विशाल राठोड, वसंत वडते, एकनाथ राठोड, जगन राठोड, शंकर राठोड, बाबुराव राठोड, रघुनाथ राठोड, विष्णू राठोड, दिलीप चव्हाण, उत्तम राठोड, शेषेराव राठोड, कृष्णा चव्हाण, अशोक नंदराम राठोड, रावसाहेब राठोड, बाजीराव राठोड, देवसिंग राठोड, अंबादास राठोड, छगन राठोड, गोविंद राठोड, जालींदर चव्हाण तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.







