क्यूशू (जपान) (वृत्तसंस्था) : भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. जपानमध्ये 6.0 रिश्टर स्केलचा धक्के जाणवले आहेत. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे संत वाजण्याच्या सुमारास जपानच्या क्यूशू राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीएसच्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र क्यूशू बेटावर होते.
जपानमध्ये या भूकंपाचे धक्के बसल्यानंतर कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. जपानध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असतात.
आज अचानक भूकंप झाल्याने तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. धक्के जाणवू लागताच नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी त्या ठिकाणी झाली नसल्याचे समजते आहे.







