पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : रमजान ईदच्या दिवशी रात्री नमाज पठाण करून घरी निघालेल्या एकाला रस्त्यात आडवून चाकुने पोटात भोकसून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सलिम शेख आणि अमिर शेख (दोघेही रा. मार्कडेयनगर, वैदवाडी हडपसर ) यांच्यावर वानवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आवेज फिरोज शेख (वय २३, रा. मार्कडेयनगर, वैद्यावाडी, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे रमजान ईदच्या दिवशी रात्री साडे आठच्या सुमारास वैदवाडी येथील अंजुमन तालीमुन मश्जीद येथून नमाज पठण करून परत निघाले होते. ते वैद्यवाडी येथील भिम साम्राज्य प्रतिष्ठान येथे आले असता त्यांना गर्दी झालेली दिसली. त्यांनी पाहिले असता तक्रारदार यांचे मामा सलजीम अमिन सय्यद यांना त्यांच्याच वस्तीत राहणारा सलीम शेख व त्याचा मोठा भाऊ अमिर शेख हे दोघेजण मारहाण करत होते. त्यावेळी सलिमशेख याच्या हातात सुर्या सारखे धारदार हत्यार होते.
अमिर शेखने सलीम सय्यद यांची कॉलर पकडून सलीम शेख यास म्हणाला की, डाल दे इसके पटे में, सलीमने चाकू मामा सलीम सय्यद यांच्या पोटात खुपसला. यावेळी त्यांच्या पोटातून रक्तस्त्राव होऊ लागला. हे पाहून तक्रारदार वाद सोडविण्यास मध्ये पडले. त्यावेळी अमिर शेख तेथून पळून गेला. मात्र सलीम याला पकडून ठेवले. त्यानंतर रिक्षातून सय्यद यांना रूग्णालयात दाखल केले.







