दारु पिण्यास पैसे दिले नाही म्हणून पतीने पत्नीवर केले कुऱ्हाडीने वार

crime
file photo

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : तळजाई वसाहत परिसरात दारू पिण्यास पैसे न दिल्याने पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी पती दत्ता राजाराम अडागळे (वय ३८) याला अटक केली आहे. पूनम दत्ता अडागळे (वय ३२, रा. खंडाळे चौक, तळजाई वसाहत, पद्मावती) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पूनम यांनी सहकारनगर पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दत्ता याचा पूनमशी २०१५ मध्ये विवाह झाला असून, त्यांना ७ वर्षांचा मुलगा आहे. दत्ता काहीही काम करत नव्हता, तसेच त्याला दारूचे व्यसन आहे. पूनम घरकाम करतात. सोमवारी (३१ मार्च) रात्री आठच्या सुमारास दत्ता दारू पिऊन घरी आला. त्याने दारू पिण्यासाठी पूनमकडे पैसे मागितले. तिने पैसे देण्यास नकार दिला.

त्यानंतर चिडलेल्या दत्ताने घरातील कुऱ्हाडीने पूनमवर हल्ला केला. पूनमने आरडाओरडा केला. तेव्हा सासूने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. कुर्हाडीचा डोक्यात घाव बसल्याने पूनम या गंभीर जखमी झाल्या. दत्ताला पोलिसांनी अटक केली असून, अधिक तपास उपनिरीक्षक रेखा साळुंके तपास करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here