शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : बुधवारी (दि.२) रोजी साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. श्रीमती किरण बाबासाहेब जाधव या दादर येथील शिवाजी पार्क येथे फायर फायटर या विभागात सेवार्थ झाल्या. त्याबद्दल त्यांनी साईसेवा निवासी मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप केले व आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, “लहानपणापासून माझे स्वप्न होते की, मी जेव्हा सेवार्थ होईल तेव्हा माझा पहिला पगार हा गोरगरिबांसाठी असेल त्यानिमित्ताने मी हे ब्लॅंकेट वाटप केले आहे.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा घुले यांच्या हस्ते श्रीमती किरण यांचा साईबाबा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला व विद्यालयाच्या वतीने त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हा सर्व कार्यक्रम विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्य यशस्वीरित्या पार पडला.







