मध्यरात्री लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर

वक्फ सुधारणा विधेयक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. काल या अधिवेशनात वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आले होते. अखेर मध्यरात्री उशिरा या विधेयकावर लोकसभेत मतदान पार पडले. वक्फ सुधारणा विधेयक अखेर मंजूर झाले आहे. विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ मते पडली. आज हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे.

 

संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक काल संसदेत सादर केले. त्यावर चर्चा करण्यात आली. विरोधकांनी या विधेयकावर जोरदार गोंधळ घातला. मध्यरात्रीपर्यंत यावर चर्चा सुरू होती. अखेर त्यानंतर मतदान पार पडले आणि हे विधेयक लोकसभेत २८८ मतांनी मंजूर झाले आहे.

आज वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे. त्या ठिकाणी यावर चर्चा केली जाईल आणि नंतर मतदान प्रक्रिया पार पडेल. हे विधेयक राज्यसभेत मंजूर होणार का हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. ही विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला 272 सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता होती. भाजपकडे 240 सदस्य आहेत, मात्र भाजपने मित्रपक्षाच्या मदतीने हे विधेयक लोकसभेत मंजूर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here