पन्हाळा (प्रतिनिधी अनिल सांगळे) : श्री दख्खनचा राजा श्री जोतिबा देवांचा प्रकटदिन सोहळा गुरुवार दिनांक ३ एप्रिल २०२५ रोजी मोठया उत्सवात साजरा झाला, प्रकटदिना निमित्त आज संपुर्ण मंदिर परिसर फुलांनी सजवले होते, पहाटे ग्रामस्थ भाविक यांनी दंडस्थान घेतले
त्यानंतर सुर्यदयावेळी सकाळी ६ वाजून ३३ मिनिटांनी श्री केदारनाथ (जोतिबा ) देवांचा प्रकटदिन सोहळा पार पडला, त्यावेळी सुंठवडा वाटप करून , फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली,श्री केदारनाथानां रुद्र अभिषेक करून आकर्षक अशी महापूजा बाधण्यात आली, प्रकटदिना निमित्त मंदिर परिसरात होम हवन,रुद्रपठण धार्मिक विधी करण्यात आले ,
दुपारी 1 वाजता महाप्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले, जयशिंगंपूर येथील सौ प्राजक्ता साळोखे यांनी रांगोळीतून जोतिबा देवांची प्रतिमा साकारली , तसेच संध्याकाळी विश्वशक्ती मित्र मंडळातर्फे स्वामी समर्थ सोंगी भजनांचा कार्यक्रम पार पडला.







