प्रा. वामनराव माने यांचा अमृत महोत्सव सोहळा थाटामाटात साजरा

प्रा. वामनराव माने

पंढरपूर (तालुका प्रतिनिधी प्रकाश इंगोले) : ईश्वरवठार (ता. पंढरपूर ) येथे माजी सभापती प्रा. वामनराव माने, यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त, अमृत महोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

प्रा. वामनराव माने यांनी स्व. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्याजवळ कायम निष्ठावंत राहिल्याने ते पंचायत समितीचे सभापती झाले. त्यामुळेच त्यांच्या शैक्षणिक संकुलाची प्रगती करता आली.असे विधान परिषद सभापती माननीय राम शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले.

या अमृत महोत्सव सोहळ्यात माजी आमदार प्रशांतराव परिचारक आ. डॉ. बाबासाहेब देशमुख,आ. उत्तमराव जानकर, माजी सभापती दिलीप घाडगे, कर्मयोगीचे माजी चेअरमन दिनकर मोरे, कृषी उत्पन्न बाजार चे सभापती हरीश गायकवाड, सभापती राजू गावडे, अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, प्रशांत देशमुख, पंडित भोसले, भास्कर कसगावडे, नगरसेवक निलराज डोंबे, शालिवाहन कोळेकर, माजी सरपंच संजय घाडगे, अंगद रणदिवे, माजी नगरसेवक शिवाजी कोळी, माजी नगरसेवक पांडुरंग घंटी, संचालक तानाजी पवार, गंगाराम विभुते, आदी मान्यवर उपस्थित होते.
तर राज्याचे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्यांक विकास मंत्री मा. दत्तात्रय (मामा) भरणे यांनी वामनराव माने यांना प्रत्यक्षात भेट देऊन त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. प्रा. वामनराव माने. यांचा अमृत महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here