पारोळा (तालुका क्राइम रिपोर्टर समाधान धनगर) : युनिव्हर्सल इंटरनॅशनल स्कूल रान बाय पोदार करिकुलम कन्सल्टन्सी पारोळा येथे श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय श्री सुदर्शन जैन,तालुका प्रमुख सेवा भारती संघ.आणि आदरणीय श्री राहुल निकम ,तालुका जागरण गट प्रमुख.उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्याकडून सरस्वती पूजन आणि श्रीराम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.त्यानंतर श्रीयुत जैन यांनी श्रीराम नवमी चे महत्व सांगत विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण केली आणि आपले विचार मांडले.त्याचबरोबर त्यांनी एक सुंदर गीत देखील गायले.त्यानंतर श्रीयुत राहुल निकम यांनी रामायण आणि महाभारत आज आपण दररोजच्या व्यवहारिक जीवनामध्ये कसे उपयोगात आणले पाहिजे याचे महत्व पटवून दिले.
त्यानंतर विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती गायत्री गुजराथी यांनी आपले विचार मांडले.त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी रामस्तुती चे खूप सुंदर रित्या पठन केले.सदर कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या उपप्राचार्य स्मिता मोरे ,आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री धनंजय पाटील सर यांनी केले तर आभार शुभांगी पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.







