दिल्लीत प्रॉपर्टी डीलरचा गोळी घालून खून

murder
file photo

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शुक्रवारी सकाळी बाह्य दिल्लीतील पश्चिम विहार भागात अज्ञात हल्लेखोरांनी फॉर्च्यूनर कारमधून प्रवास करणाऱ्या एका प्रॉपर्टी डीलरची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केली.

 

दिल्लीतील पश्चिम विहारमध्ये एका प्रॉपर्टी डीलरची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही शुक्रवारी (११ एप्रिल) सकाळी भर रस्त्यात ही घटना घडली. राजकुमार दलाल या व्यावसायिकाची फॉर्च्युनर कारमधून जिमला जात असताना हत्या करण्यात आली. या हल्ल्यात तरुणाला अनेक गोळ्या लागल्या, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी कारला लक्ष्य करून ८ ते १० राउंड गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या चालकाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्राथमिक तपासात मृत व्यक्ती प्रॉपर्टी डीलर असल्याचे समोर आले. मृताचे नाव अद्याप उघड झालेले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here