पुण्यात तरुणाकडून कुत्रीवर अनैसर्गिक कृत्य

कुत्रीवर अनैसर्गिक कृत्य

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : एका पाळीव कुत्रीला खाण्याचं आमिष दाखवून तिच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार पुण्यात घडला असून, या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




याबाबत समजलेली माहिती अशी की, आरोपी हल्लीमुद्दीन अमिनल शेख (वय २०, रा. कांदोरी, जिल्हा मुर्शिदाबाद पश्चिम बंगाल) याच्याविरोधात फिर्याद देण्यात आली होती. आरोपी हा फिर्यादी यांच्या शेजारील गोडाऊनमध्ये काम करत होता. फिर्यादी हे त्यांच्या स्वत:च्या मूळ गावी गेले असताना आरोपी ने २६ मार्च रोजी रात्री ११.३०च्या सुमारास अनाधिकृतपणे फिर्यादी त्यांच्या पार्किंगमध्ये येऊन फिर्यादी यांची कुत्री (श्वान) पेनी हिच्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याचं सांगण्यात आलं असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

या प्रकरणी ४१ वर्षीय व्यक्तीने पोलिसात तक्रार दिली आहे. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने फिर्यादी यांची तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here