दोन तरूणींचा एकाच तरुणावरून पोलीस ठाण्यातच राडा

पोलीस ठाण्यातच राडा
file photo प्रतीकात्मक चित्र

भोपाळ (मध्यप्रदेश) : शहरातील शाहजहांनाबाद पोलीस ठाण्यातच प्रेमासाठी घमासान घडलं. दोन तरूणींमध्ये जबरदस्त भांडण झालं. आधी दोघींमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. शहरात शांतता राखणाऱ्या पोलिसांसमोरच हा सगळा प्रकार घडला. 




शहरातील शाहजहांनाबाद पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली. प्रेमासाठी वाटेल त्या म्हणणाऱ्या दोन तरूणींमध्ये हाणामारी झाली. दोघींनी एकमेकींना लाथाबुक्क्यांनी तुडवलं. एका तरुणावर दोघींचं प्रेम जडलं होतं. त्याच्यावरूनच दोघींमध्ये आधी बाचाबाची झाली. त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं. या घटनेमुळं पोलीस ठाण्याच्या परिसरातील वातावरण तापलं होतं.

एका तरुणासाठी त्या दोन तरुणींमध्ये मोठा वाद झाला. त्यातील एका तरुणीचा साखरपुडा झाल्याचं सांगण्यात येत आहे. एक तरुणी गुरुवारी शहरातील शाहजहांनाबादच्या पोलीस ठाण्यात पोहोचली. तिनं पोलिसांकडं अर्ज दिला. तिचं एका तरुणाशी लग्न ठरलं आहे. दोघांचा साखरपुडाही झाला आहे. आता तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या घराशेजारी राहणारी तरुणी त्याच्यावर लाइन मारते, असा आरोप तरुणीने केला. तिला अनेकदा समज देण्यात आली, पण ती काही केल्या ऐकत नाही, असं तिचं म्हणणं आहे.

तरुणीच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी दुसऱ्या तरुणीला पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं. ती तरुणी आपल्या कुटुंबीयांसोबत पोलीस ठाण्यात आली. हा वाद सोडवण्यासाठी त्यांच्यात चर्चा सुरू होती. त्यावेळी दोन्ही तरुणींमध्ये बाचाबाची झाली. बघता बघता वाद चिघळला. त्या दोघींची शाब्दिक चकमक हाणामारीपर्यंत गेली. दोघींनी एकमेकींना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वादात दोघींचे कुटुंबीय पोहोचले. त्यानंतर वातावरण तापलं. दोघांचे कुटुंबीय एकमेकांना भिडले. जोरदार हाणामारी झाली.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here