तळेगाव नजीक रस्ते अपघातात सायबर सिक्यूरीटी एक्सपर्ट तरुणाचा मृत्यू

accident
file photo

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : बोरीवली येथे राहणारा सचिन महेंद्र देढिया (वय ४१) या सायबर सिक्यूरीटी एक्सपर्ट तरुणाचा तळेगावनजीक अपघातात मृत्यू झाला. या अपघातात कार चालकाचाही मृत्यू झाला आहे. 



देढीया हे बोरीवली येथे राहत होते. ते सायबर संदर्भात एक कंपनी चालवित होते. त्याचबरोबर सायबर सेक्यूरीटी आणि डिजिटल फॉरेन्सीक एक्सपर्ट होते. ते पोलिस खात्यातील पाेलिसांना सायबर सेक्यूरीटी विषयी मार्गदर्शन करायचे.

आज त्यांचे पुणे येथील इंडियन चार्टड अकाऊंटंट संस्थेत कृत्रिम बुद्धीमत्ता या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याला जाण्याकरीता निघाले हाेते. त्यांच्या कारला पुणे तळेगावनजीक अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात कारचा चालकही मृत्यूमुखी पडला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here