भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) : कुऱ्हे पानाचे येथे ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून गावातील बसस्थानक चौकात व ठिकठिकाणी जवळपास १० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शुक्रवार दि.११ रोजी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी कुऱ्हे पानाचे आऊट पोष्ट चे पो.ऊ.नि. संजय कंखरे , पो. काँ. उमेश बारी, माजी जि. प. सदस्य समाधान पवार, सरपंच दुर्गाबाई शिंदे, माजी सरपंच सुरेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य जिवन पाटील, रामलाल बडगुजर , सावकार पारधी, ग्रामविकास अधिकारी संतोष मोरे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
सुरवातीला महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पो.नि. महेश गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बसस्थानक चौकात आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने एखादी घटना घडली किंवा चोरीच्या घटना उघडकिस आणण्यासाठी मदत होणार असल्याने गावागावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे असल्याचे पो नि. महेश गायकवाड यांनी सांगितले.







