पंढरपूर पोलिसांची अवैध ऑनलाईन रुलेट जुगार सेंटरवर कारवाई; ११ जणांवर गुन्हे दाखल

जुगार सेंटर

पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) : दि.09/04/2025 रोजी मा. परिविक्षाधीन आय.पी.एस. अंजना क्रिष्णा व्ही. एस प्रभारी अधिकारी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे यांना सांगोला पोलीस ठाणे हद्दीत चालत असले बेकायदेशीरपणे विनापरवाना संगणकावर ऑनलाईन आकडे लावून लोकांचे कडून त्यांना पैशाचे आमिष दाखवून ऑनलाईन रुलेट जुगारावर पैसे स्विकारुन जुगार चालवित असल्याची गोपनीयरित्या बातमी मिळाली.

 

या गोपनीय बातमीची दखल घेत परिविक्षाधीन आय.पी.एस. अंजना क्रिष्णा व्ही.एस प्रभारी अधिकारी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे वेगवेगळी पथके तयार करून एकाच वेळी सांगोला येथील शिवाजी चौक येथील धान्य बाजार येथे छापा टाकला असता तेथे एका खोलीतील गाळ्यात इसम नामे (1) फिरोज सिकंदर मुल्ला रा. मुजावर गल्ली सांगोला हा सदर ठिकाणी ऑनलाईन जुगार अड्डा चालवित असल्याचे व इसम नामे 2) अक्षय विजय इंगोले रा. मणेरी गल्ली सांगोला जि. सोलापूर 3) अनिल भारत जाधव रा. जयभवानी चौक, सांगोला जि. सोलापूर 4) राजन उदयसिंह देशमुख रा. देशमुख गल्ली, सांगोला जि. सोलापूर 5) सोहेल तायर खतीब रा. भोपळे रोड सांगोला जि. सोलापूर 6) आस्लम जाफर मुलाणी रा. भोपळे रोड सांगोला जि. सोलापूर 7) जैश रियाज मुजावर रा. मुजावर गल्ली सांगोला जि. सोलापूर 8) विशाल शिवाजी गायकवाड रा. भिमनगर सांगोला जि. सोलापूर १) मोहसीन ईलाही खतीब रा. मुजावर गल्ली सांगोला जि. सोलापूर हे इसम सदर ठिकाणी ऑनलाईन जुगार खेळत असताना मिळून आलेले आहेत, तसेच दुस-या एका खोलीत इसम नामे 10) ज्ञानेश्वर उर्फ माऊली तानाजी गायकवाड रा. सांगोला ता. सांगोला जि. सोलापूर हा सिद्धीविनायक ऑनलाईन जुगार सेंटर चालवित असून त्यास 11) विजयसिंह पांडूरंग मिसाळ रा. पाचेगाव खुर्द ता. सांगोला जि. सोलापूर हा मदत करीत असल्याचे मिळून आलेने सदर 11 इसम यांचेकडून दोन मोटारसायकल, एकूण 9,95,160/- रु किंमतीचे जुगाराचे साहित्य जप्त करणेत आलेले आहे व संबंधित इसम यांचेवर सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांचे आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे परिविक्षाधीन आय. पी. एस श्रीमती अंजना क्रिष्णा व्ही. एस सो तसेच पो.उप नि. अनिल पाटील, विरसेन पाटील, म.पो.उप.नि. ज्योती बैनवाड, पो.हे.काँ. मनोज कुंभार, पो.ना. ईलाही मुलाणी, पो.काँ. गणेश पाटील, पो.काँ. आयाज काझी, चा. पो.काँ. रमेश म्हेत्रे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here