पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी सतर्कता बाळगा : आमदार समाधान आवताडे यांच्या सूचना

आमदार समाधान आवताडे

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे .यामुळे पाण्याची होणार नाही याची खबरदारी भीमा पाटबंधारे आणि निरा भाटकर विभागाने घेण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. अशा सूचना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकास प्रिय आमदार समाधान आवताडे यांनी दिले आहेत.

 

गुरुवारी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे भीमा पाटबंधारे आणि निरा भाटकर विभागातील संबंधित सर्व अधिकाऱ्यासमवेत बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार अवताडे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिली आहेत. मान नदीतील बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात यावे. पाणी मिळत नाही त्या शेतकऱ्यांना प्राधान्याने पाणी देण्यात यावे सूचना दिल्या
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील गावातील प्रमुख कार्यकर्ते बैठकीसाठी बोलवण्यात आले होते.

या बैठकीमध्ये या उपस्थित कार्यकर्त्यांनी पाणी प्रश्न संदर्भात प्रश्न उपस्थित केले. सूचना केल्या. वाखरी आणि गादेगाव या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरी ओढ्याच्या काठावर असलेल्या या ओढ्यामध्ये पाणी सोडण्यात यावे. उंबरगाव भोहाळी ओढ्यास जांभुळबेट ओढ्यालाही पाणी सोडून देण्याची आमदार अवताडे यांनी यावेळी केल्या. या बैठकीवेळी भीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हरसुरे सो. उप कार्यकारी अभियंता इंगोले मॅडम. मीरा भाटकर विभागाचे उप अभियंता पासलकर सो. विविध भागातील कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here