उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्योगपती शिक्षणसम्राट भाऊसाहेब रुपनर यांचा सत्कार

एकनाथ शिंदे

सांगोला (प्रतिनिधी रमेश चव्हाण) : फॅबटेक कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँण्ड रिसर्च, सांगोला यांनी ऑटोनॉस (स्वायतात) दर्जा मिळाला. त्याबद्दल फॅबटेकचे चेअरमन व विश्वस्त शिक्षण सम्राट उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळा व भव्य स्मारकाचे अनावरण व लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते सांगोला येथे गुरुवार दिनांक 10 एप्रिल रोजी संपन्न झाला यावेळी आयोजित जाहीर सभेदरम्यान उद्योगपती शिक्षण सम्राट भाऊसाहेब रुपनर यांचा सत्कार संपन्न झाला यावेळी विधानसभेचे उपसभापती अण्णा दादू बनसोडे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार राजू खरे आमदार समाधान आवताडे माजी आमदार शहाजी बापू पाटील माजी आमदार दीपक आबा साळुंखे ज्येष्ठ नेते प्रा. पी.सी झपके सर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार आदी उपस्थित होते.

सांगोला सारख्या ग्रामीण व दुष्काळ भागात सन 2011 मध्ये तालुक्यातील व पंचक्रोशीतील हुशार व हेतुरु विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर माफक मध्ये उच्च तांत्रिक शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने फॅबटेक एज्युकेशन सोसायटीने फॅबटेक टेक्निकल कॅम्पसची स्थापना केली या कॅम्पस मध्ये इंजिनिअरिंग कॉलेज बरोबरच डिप्लोमा फार्मसी डिग्री व डिप्लोमा सीबीएसई माध्यमाचे पब्लिक स्कूल इत्यादी अभ्यासक्रम सुरू केले नुकतेच विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च सांगोला यांना ऑटोनॉस (स्वायत्तता ) दर्जा बहाल केला आहे या निमित्ताने प्रशासकीय कामकाजाच्या कौशल्याच्या आधारे अल्पविधीतच कॅपस नाव रूपाला आणणारे संस्थेचे चेअरमन शिक्षण सम्राट व विश्वस्त श्री भाऊसाहेब रुपनर व त्यांचे सहकार्याचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. नामदार एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here