जोतिबा चैत्र यात्रेत प्रथमच बाईक अँबुलन्सची सेवा

जोतिबा चैत्र

पन्हाळा (प्रतिनिधी अनिल सांगळे) : जोतिबा चैत्र यात्रेचे स्वरूप भव्य स्वरूपाचे असते, यात्रेमध्ये ७ ते ८ लाख भाविक भक्त सहभागी होत असतात, या यात्रेमध्ये भाविक भक्तांच्या सेवेसाठी प्रशासन, आरोग्य विभाग, अन्नछत्र यासारख्या अनेक सेवाभावी संस्था मोहीम राबवतात.

या सर्वामध्ये जनसेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे भाविकांच्या सेवेसाठी पालखी मार्ग सेंट्रल प्लाझा या ठिकाणी, दख्खन केदार सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रोहित मिटके आणि यशवंत चॅरिटेबल ट्रस्टचे जयंत पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही मोफत हॉस्पिटलचा उपक्रम राबवला होता.
जोतिबा हे तिर्थस्थळ डोंगरावर असल्याने आणि यात्रेमध्ये मोठया प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे, आपत्कालीन परिस्थिती वेळी प्रथमोपचार करण्यासाठी कमीत कमी वेळात पोहचता यावे व प्रत्येकाला वेळेवर औषध उपचार करता यावा, यासाठी प्रथमच बाईक अँबुलन्स सुविधा राबवण्यात आली होती, या सेवेमुळे कमीत कमी वेळात प्रत्यक्ष ठिकाणी पोहचवून औषधउपचार करणे सोयीचे झाले, त्यामुळे या सेवेचा लाभ अनेक भाविकांनी घेतला या कार्याबद्दल भाविक भक्तांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here