पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी ‘संविधान ग्रुप’ च्या वतीने १४ एप्रिल २०२५ रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नियती फाऊंडेशन संचालित बाल आश्रम, वृद्धाश्रम (आळंदी) येथे अन्न धान्य वाटप, शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ भीम गीत गायन, गुणवंतांचा सत्कार, पाणी वाटप, भीम जलसा असे विविध कार्यक्रम सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत आयोजित करण्यात आले आहेत. ‘संविधान ग्रुप’ चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन गजरमल, संस्थापक राकेश सोनवणे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
प्रदेश संघटक प्रवीण सोनवणे, पुणे शहराध्यक्ष गणेश लांडगे, पुणे शहर उपाध्यक्ष राजवर्धन कांबळे,निलेश निकम, सागर जगताप, सतीश नेहाटकर, बाळासाहेब कडू ,मुदस्सर शेख, सागर आढागळे ,प्रफुल देवकुळे हे कार्यक्रम यशस्वी करण्या साठी कार्यरत आहेत.







