लंडन येथे स्थापन होणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पादुकांचे मंदिर समितीच्या वतीने पूजन

श्री विठ्ठल रुक्मिणी

पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) : श्री विठ्ठल भक्त अनिल एकनाथ खेडकर मुळ गांव अहिल्यानगर असून सध्या लंडन, युके येथे स्थायिक आहेत, ते युके म्हणजेच लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्यदिव मंदिर साकारणार आहेत. त्यानिमित्ताने आज पादुकासह दिंडी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने त्यांचेकडील पादुकांचे मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.

 

यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा व विभाग प्रमुख पांडूरंग बुरांडे तसेच अनिल खेडकर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेले पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, आणि वारीची, संत परंपरेची गाथा आता जगभरात पोहोचणार असून काही वर्षात युके म्हणजेच लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्यदिव मंदिर श्री विठ्ठल भक्त अनिल खेडकर साकारणार आहेत. यानिमित्ताने १४ एप्रिल ते २१ जून २०२५ दरम्यान पंढरपूर ते लंडन अशी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार आहे. यासाठी लंडन येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर टीम प्रयत्नशील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here