चोपडा (तालुका प्रतिनिधी संदीप ओली) – शहरातील यशोधन हॉस्पिटलच्या सभागृहात आज दि.19 ऑगस्ट बुधवार रोजी सोशल डिस्टींगचे पालन करीत जागतिक फोटोग्राफी दिवस कॅमेराचे पुजन करुन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ फोटोग्राफर विजय मोहन पाटील होते.
चोपडा तालुका फोटोग्राफर असोसिएशन व पत्रकार बंधु यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नामांकित दंतचिकित्सक डाॅ. राहुल पाटील,जेष्ठ फोटोग्राफर विजय पाटील,गाव माझा न्युज चॕनलचे प्रतिनिधी मिलिंद सोनवणे,चोपडा इलेक्ट्राॕनिक मिडीया असोसिएशनचे अध्यक्ष व मराठी वन न्युज चॕनलचे संदिप ओली,लोक न्युज चॕनलचे नारायण साळुंखे,पत्रकार श्रीकांत नेवे,भगवान नायदे,भगवान उर्फ छोटु वारडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.डाॅ.राहुल पाटील यांनी मनोगत व्यक्त करुन फोटोग्राफर बंधुना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रियल मुव्हीजचे संचालक रईस शेख यांचे वडील शेख लुकमान व रियाउद्दिन सैय्यद या दिवंगतांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.उपस्थित मान्यवरांचे स्वागत कोरोना प्रतिबंधक मास्क देऊन करण्यात आले.यावेळी प्रकाश राजपूत, उमेश पाटील,योगेश राजपूत, संजय सोनवणे,आशिष पाटील, बंडु पाटील,जावेदभाई,अजहर तेली,रईस शेख,जानकीराम कोळी,कृष्णा जाधव,अजहर शेख,सलमान खान,मुन्ना कोळी, योगेश बैरागी,योगेश शर्मा, गोविंदा धनगर,शुभम माळी आदीचे स्वागत फोटोग्राफर असोसिएशनचे छोटु वारडे व सहकार्यांनी यांनी केले. कार्यक्रमचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन जेष्ठ पत्रकार व कवी रमेश जे.पाटील यांनी केले.








