सावदा : २१ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

आत्महत्या

जळगाव (जिल्हा क्राईम रिपोर्टर अकरम खान) : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा शहरातील मस्कावद रोडवरील भोईवाडा परिसरात राहणाऱ्या विनायक उर्फ विकी मोनज पवार (वय २१) या तरुणाने शुक्रवारी (दि. २५ एप्रिल) दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने सावदा शहरात खळबळ उडाली असून आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट आहे.

विकी पवार हा आपली आई, विवाहित बहीण आणि लहान भावासह भोईवाडा परिसरात राहत होता. फैजपूर रोडवर त्याचे ‘पवार अॅक्वा’ नावाचे दुकान आहे. शुक्रवारी दुपारी त्याने घराच्या छताच्या कडीला दोरी बांधून गळफास घेतला. ही घटना समोर येताच परिसरात एकच हलकल्लोळ उडाला.
स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. सावदा पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, सहाय्यक फौजदार संजय देवरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here