राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) पिंपरी चिंचवड शहर ओबीसी सेल अध्यक्षपदी प्रशांत महाजन

राष्ट्रवादी काँग्रेस

पुणे (उपसंपादक प्रशांत महाजन) : पिंपरी चिंचवड शहर जिल्हा ओ.बी.सी. सेल अध्यक्षपदी तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते, खान्देश माळी मंडळाचे सदस्य, खान्देश विकास प्रतिष्ठानचे प्रशांत भास्कर महाजन यांची नुकतीच निवड करण्यात आली.

 

प्रशांत महाजनत्यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य ओ.बी.सी.सेल. अध्यक्ष कल्याणराव आखाडे, विधानसभेचे उपसभापती आण्णा बनसोडे, आमदार विलास लांडे, महापौर योगेश बहल, सौ.कविताताई आल्हाट प्रदेश कार्याध्यक्ष सचिन आवटे, मा.नगरसेवक प्रकाश सोमवंशी, नाना काटे, प्रशांत शितोळे श्री कांबळे साहेब व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रशांत महाजन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय क्रियाशील कार्यकर्ते आहेत नियुक्ती नंतर महाजन यांनी पक्षासाठी झोकून काम करु राज्यातील,व देशातील सर्वात मोठ्या असलेला ओबीसी समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाचे ध्येय धोरणे पोहचवू असे सांगितले या निवळी नंतर प्रशांत महाजन यांचे सर्व स्थरातून अभिनंदन केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here