हिंगोली (जिल्हा क्राईम रिपोर्टर विष्णु हनवते) : बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद ) संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे हिंगोली जिल्ह्याच्या विकासातील एक दिशा दर्शक प्रकल्प असून यामुळे हळद पिकाच्या नव्या सुवर्ण क्रांतीला सुरवात झाली असे मत हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री नामदार हेमंत पाटील यांनी व्यक्त करून हळद संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर सध्या प्रगती पथावर असलेल्या ईमारत बांधकामाची पाहणी केली व कामाबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.
हळद संशोधन केंद्रामुळे मराठवाड्यासह विदर्भाला सुद्धा याचा लाभ होणार आहे. केंद्राच्या प्रक्षेत्रावर देशातील जास्त कुरकुमीन असणाऱ्या हळदीच्या नवनवीन प्रजातींची लागवड करण्यात येत आहे. टिश्यू कल्चर च्या माध्यमातून बेणे तयार करण्यात येऊन त्याची विक्री शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.सध्या या ठिकाणी ईमारत बांधकामास सुरवात झाली आहे हे बांधकाम प्रगती पथावर आहे या बांधकामाची पाहणी हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री नामदार हेमंत पाटील यांनी केली.यावेळी त्यांनी कामाबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मागील 3 वर्षांपासून हळद संशोधन केंद्र जनजगृती करत आहे.
शेतकऱ्यांना अधिकची माहिती व्हावी यासाठी शेतकरी मेळावे, कृषी कार्यशाळा, कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहेत त्यातून शेतकरी, हळद उत्पादक यांना माहिती दिली जाते. यापूर्वी राज्य शासनाने संशोधन केंद्रासाठी 100 कोटी चा निधी दिला आहे.त्यानंतर पुन्हा 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हळद पिकांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरून त्याचा वापर हळद पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी कसा करता येईल याकरिता विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या सध्या प्रचलित झालेल्या AI तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा यामध्ये करता येईल याबाबत संशोधन सुरू आहे.भाभा अनुसंधान केंद्राचे आय रेडिएशन केंद्र हा याच प्रकल्पाचा भाग आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हळदीचे उत्पन्न वाढवून हळदीला भविष्यात जागतिक बाजारपेठ मिळेल यात दुमत नसल्याचे नामदार हेमंत पाटील म्हणाले.







