15 लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त
मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – तळोजा पोलीस ठाण्याच्या औद्योगिक क्षेत्रात डिझेल चोरी करणाऱ्या 3 आरोपींना तळोजा पोलीस ठाणे कडून अटक करण्यात आली. तांत्रिक तपासाद्वारे आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून चोरीचे 350 लिटर डिझेल आणि चोरीसाठी वापरण्यात येणारी 3 चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. हा एकूण रु. 15,27,650 किंमतीचा मुद्देमाल आहे. याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे.
16 ऑगस्ट लॅपटॉप चोरी करणाऱ्या चोरांना 36 तासात रबाळे एमआयडीसी पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. या चोरांकडून एकूण 6,00,000 रुपये किंमतीचे डेल कंपनीचे 6 लॅपटॉप चार्जरसह पोलिसांनी जप्त केले होते. एका मुलीचा मागोवा घेत पुणे येथून आलेल्या 8 जणांनी मुलीच्या भावास चाकूने मारहाण केली. त्यानंतर कोपरखैरणे पोलिसांनी भरपावसात पाठलाग करुन 5 आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून गुन्ह्यात वापपरण्यात आलेली ओमनी कार, हॉकी स्टीक, चाकू व सुऱ्या हस्तगत करण्यात आल्या







