धुळ्यातील सिध्देश्वर हॉस्पीटलची उपचारामध्ये दिरंगाई; रुग्णाने मांडली कैफियत

सिध्देश्वर हॉस्पीटल

धुळे (विशेष प्रतिनिधी) : धुळ्याजवळील वडणे फाटा येथे गाडी उलटल्याने अपघात झाला. अपघातातील जखमी बोरीस येथील राहिवासी सागर बोरसे यांना जखमी अवस्थेत सिध्देश्वर हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सहा तासांनीही आपल्यावर योग्य ते उपचार होत नसल्याची कैफियत सागर यांनी ‘बुलंद पोलीस टाइम्स’समोर मांडली आहे.

वडणे फाट्यावर झालेल्या अपघातात सागर बोरसे यांना हाताला, पायाला आणि विशेष करुन पोटाला मार लागलेल्या अवस्थेत सकाळी ९.३० वाजता सिध्देश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटाला जबर मार लागलेला असतांनाही दुपारी ३ वाजेपर्यंत सागर यांना केवळ झोपवून ठेवण्यात आले.

पोटाला मार लागल्याने तात्काळ सोनोग्राफी करणे गरजेचे असतांना, सहा तास केवळ ॲण्टीबायोटीक्स देणे सुरु ठेवल्याने, आपल्यावर योग्य उपचार होत नसल्याची व तातडीने योग्य ते उपचार सुरु करण्याची मागणी करत जखमी रुग्ण सागर बोरसे यांनी आपली कैफियत मांडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here