बुलढाण्याचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून निलेश तांबे यांची नियुक्ती

निलेश तांबे

बुलडाणा (जिल्हा क्राईम रिपोर्टर सचिन जगदाळे) : जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकपदी निलेश तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांची बदली करण्यात आली असून, गृह विभागाने आज त्याबाबत अधिकृत आदेश जाहीर केले.

विश्व पानसरे यांची बदली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९, अमरावती येथे समादेशक म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी निलेश तांबे हे आता बुलढाण्याचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
तांबे यापूर्वी नागपूर येथील पोलिस अधीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अनुभवाचा फायदा बुलढाणा जिल्ह्याला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here